पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १०९, खामगाव ५७, शेगाव पाच, देऊळगाव राजा ११८, चिखली १२, मेहकर १९, मलकापूर १५, नांदुरा ४७, लोणार २०, मोताळा २५, जळगाव जामोद ७३, सिंदखेड राजा ७१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५२ जणांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ७८ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील पळशी येथील येथील ५५ वर्षीय व्यक्ती, शेगावातील धनगरनगरमधील ४६ वर्षीय व्यक्ती, मध्यप्रदेशातील इंदूर येथील ४९ वर्षीय व्यक्ती, खामगाव शहरातील ४७ वर्षीय व्यक्ती, अकोल्यातील टाबकी रोड येथील ६५ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सुटाळा येथील ६२ वर्षीय व्यक्ती, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ८० वर्षीय व्यक्ती, लांजुड येथील ३८ वर्षीय व्यक्ती, लोखंडा येथील ५५ वर्षीय महिला, बोरी अडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
--३,७०,७६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ७० हजार ७६५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आतापर्यंत ६१ हजार ५८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी ६४८ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ६९६० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६८ हजार २०३ झाली असून, त्यापैकी ६१७० सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.