कोरोनाबाधितांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १५२, खामगाव तालुक्यातील १०३, देऊळगाव राजा तालुक्यातील ४३, चिखली तालुक्यातील ४४, मेहकर तालुक्यातील ५०, मलकापूर तालुक्यातील १७, नांदुरा तालुक्यातील ३२, लोणार तालुक्यातील ५२, मोताळा तालुक्यातील १४, जळगाव जामोद तालुक्यातील ८, सिंदखेड राजा तालुक्यातील १४ आणि संग्रामपूर तालुक्यातील २५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील एकही जण तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही.
दुसरीकडे उपचारादरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील घाटपुरी येतील ६० वर्षीय महिला, सुटाळा येथील ४२ वर्षीय व्यक्ती, गावंढळा येथील ५३ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील भोसा येथील ५३ वर्षीय महिला, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव येथील ८१ वर्षीय व्यक्ती, लोणार तालुक्यातील वेणी येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे येथील ८० वर्षीय पुरुष, चिखली तालुक्यातील भानखेड येथील ५८ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील ३७ वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील चावरा येथील ७० वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील ५८ वर्षीय पुरुष, बुलडाणा शहरानजीकच्या साखली येथील ६५ वर्षीय पुरुष सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.
दुसरीकडे ७८२ जणांनी २३ मे रोजी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ४८ हजार ५५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७६ हजार ९८५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--४,०६६ अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही ४ हजार ६६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार ३३६ झाली आहे. ४ हजार ७९३ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे ५५८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.