कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १०५, खामगाव तालुक्यात ६२, शेगावमध्ये ५, देऊळगाव राजा ८७, चिखली ८०, मेहकर १४६, मलकापूर ३८, नांदुरा ६४, लोणार २७, मोताळा ६९, जळगाव जामोद ३३, सि. राजा ७०, संग्रामपूर तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ६० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ४२ वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष आणि दुधा येथील ५५ वर्षीय महिला, तसेच बुलडाणा शहरातील ५३ वर्षीय महिला आणि शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ९०३ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख २५ हजार ३०३ संदिग्धांचे अहवालही निगेटिव्ह आलले आहेत.
--२,४९१ अहवालाची प्रतीक्षा--
मंगळवारी तपासणीसाठी २,४९१ संदिग्धांचे अहवाल घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७९ हजार २७० झाली आहे. त्यापैकी ७३ हजार ३४६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयात ५ हजार ४०२ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ५२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.