पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १८६, खामगावमध्ये ९७, शेगावात ११७, देऊळगाव राजामध्ये ११६, चिखलीमध्ये १०८, मेहकर १०७, मलकापूर ७८, नांदुरा १३३, लोणार ९१, मोताळा ४६, जळगाव जामोद ६७, सि. राजा ५६, संग्रामपूर तालुक्यातील २६ जणांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवारी उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील गेरू येथील ५५ वर्षीय महिला, खामगावातील शेलगाव नाका येथील ५० वर्षीय महिला, उंबरा येथील ५५ वर्षीय महिला, सरंबा येथील ८० वर्षीय महिला, मेहकरमधील मारोती पेठ भागातील ४५ वर्षीय पुरुष, हिवरा आश्रम येथील ५८ वर्षीय महिला, बुलाडण्यातील ८१ वर्षीय पुरूष आणि ५५ वर्षीय महिला, चिखलीमधील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ५८९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--५,७२९ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७६ हजार १६६ झाली असून यापैकी ६९ हजार ९३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयामध्ये ५७२९ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ७ हजार १५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेेल आहेत. दरम्यान अद्यापही १,४३७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५०१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.