लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४५९ अहवालांपैकी ४४२ अहवाल निगेटिव्ह आले असून, १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्याही आता १४२ झाली आहे तर एकूण कोरोना बाधितांची संख्या ११,७३५ झाली आहे. त्यापैकी २८८ सक्रिय रुग्ण आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, जांब एक, नांदुरा तीन, भोकरवाडी एक, पाटोदा एक, मलगी एक, तांदूळवाडी दोन, लोणार शहरातील एकाचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ३३ असून, यामध्ये चिखली कोविड केअर सेंटरमधून तीन, जळगाव जामोदमधून आठ, सिंदखेड राजा तीन, देऊळगाव राजा १४, बुलडाणा १३ आणि खामगावमधील तीन जणांचा समावेश आहे. बुलडाणा शहरातील तानाजी नगरमधील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी ८० हजार ७३९ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांपैकी ११ हजार ३०५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी १,४५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ७३५ झाली आहे. प्रत्यक्षात रुग्णालयात २८८ सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत १४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे बुलडाण्यात आणखी एकाचा मृत्यू, १७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:19 PM