पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७२ व रॅपिड अँटीजेन टेस्टमधील एक अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १६४८, तर रॅपिड टेस्टमधील ७६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव येथील २२, खामगाव तालुक्यातील मांडका, भालेगाव, गणेशपूर, घाटपुरी, पळशी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. चिखली शहरात चार, चिखली तालुक्यातील सवडत येथे एक, शेगाव तालुक्यातील माटरगाव, टाकळी धारव, जवळा येथे प्रत्येकी एक, सगोडा दोन व शेगाव शहरात नऊ रुग्ण सापडले आहेत. बुलडाणा शहरात आठ, मोताळा तालुक्यातील पोफळी तीन, मोताळा शहरात एक, मेहकर शहर १०, दे. राजा एक, नांदुरा एक, मलकापूर दोन पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान राजे संभाजीनगर, बुलडाणा येथील ८२ वर्षीय महिला व मेहकर येथील ७७ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
९८ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील ९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुलडाणा स्त्री रुग्णालय एक, सिद्धिविनायक हॉस्पिटल एक, दिव्यांग विद्यालय २६, मलकापूर तीन, चिखली ११, दे. राजा १०, खामगाव पाच, शेगाव १५, मेहकर सात, नांदुरा एक, जळगाव जामोद पाच, मोताळा नऊ आणि सिंदखेड राजा येथील चार रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.