पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ५४, खामगाव ११, देऊळगाव राजा २८, चिखली १, मेहकर १३, मलकापूर ३, नांदुरा ६, लोणार २१, मोताळा २, जळगाव जामोद १, सिंदखेड राजा तालुक्यातील ११ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान शेगाव व संग्रामपूर तालुक्यामध्ये तपासणीत एकही संदिग्ध बाधित नसल्याचे समोर आले. त्यामुळे गुरूवारी या दोन्ही तालुक्यातील बाधितांची संख्या ही शून्य होती.
दुसरीकडे उपचारादरम्यान अमरावती जिल्ह्यातील गणुवाडी येथील ४० वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील ६८ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील ६२ वर्षीय महिला, आडविहीर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील ७० वर्षीय व्यक्ती आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या उबाळखेड येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान २९९ बाधितांनी गुरूवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ९२ हजार ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८३ हजार २९५ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१०९६ अहवालांची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेतलेल्या १ हजार ९६ अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८५ हजार २३२ झाली आहे. त्यापैकी १ हजार ३१५ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.