प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी ६८०३ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यांपैकी ५,५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एकट्या बुलडाणा तालुक्यात २५९, खामगावमध्ये ७६, शेगावमध्ये ५०, देऊळगाव राजात ६०, चिखलीत १२८, मेहकरमध्ये २०४, मलकापूरमध्ये ५१, नांदुऱ्यात ८७, लोणारमध्ये १०१, मोताळ्यात ११५, जळगाव जामोदमध्ये ६८, सिंदखेड राजामध्ये ८५ आणि संग्रामपूर तालुक्यात १ याप्रमाणे १२८५ जण कोरोनाबाधित आढळून आले.
सरीकडे बुलडाणा शहरातील जुनागाव येथील ५८ वर्षीय व्यक्ती आणि शहरातील ६५ वर्षीय महिला, साखरखेर्डा येथील ६५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ५४ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच लोणार तालुक्यातील गायखेड येथील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शनिवारी ६८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ४ हजार १३५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर २ लाख ९६ हजार २१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
--६५७६ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता ६,५७६ झाली असून, आतापर्यंतची सक्रिय रुग्णांची ही विक्रमी संख्या आहे. या संख्येसोबतच एकूण कोरोना बाधितांची संख्याही ५१ हजार २८१ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनामुळे ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे.