पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ३५, खामगाव १२, शेगाव दोन, देऊळगाव राजा ११, चिखली ११, मेहकर ९, मलकापूर २, नांदुरा १५, लोणार ७, मोताला ४, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १५, आणि संग्रामपूर तालुक्यातील दोघाजणांचा समोश आहे. दुसरीकडे, उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ५५ वर्षीय महिला, जळगाव-जामोद तालुक्यातील ४२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील वळती येथील १०० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३२० जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी चार लाख ८४ हजार ६५९ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत; तर ८२ हजार ६६३ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
७०९ अहवालांची प्रतीक्षा
अद्यापही ७०९ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार ९०६ झाली आहे. त्यांपैकी एक हजार ६३४ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत ६०९ जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.