पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात दहा, खामगाव एक, शेगाव चार, देऊळगाव राजा १३, चिखली सात, मेहकर आठ, मलकापूर १६, नांदुरा एक, लोणार चार, मोताळा दोन, जळगाव जामोद सहा, सिंदखेड राजा दोन आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७१ वर्षीय महिला आणि मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील ४६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शनिवारी १३९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ८३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८३ हजार ७२३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--११३६ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यात सध्या ११३६ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजार ४८८ एवढी आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ६२९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी सांगितले.