लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात रविवारी पुन्हा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून ३७९ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले. रविवारी तपासण्यात आलेल्या १९४७ संदिग्धांपैकी १५६८ जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. दरम्यान, रविवारी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २०० झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २,६६९ आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी गौलखेड एक, घुई एक, चिंचोली १३, शेगाव २०, बुलडाणा ४०, सुंदरखेड तीन, तांदुळवाडी एक, चिखली २८, लोणी लव्हाळा एक, अमडापूर दोन, शिरपूर दोन, खामगाव २८, शिर्ला नेमाने एक, सुटाळा बुद्रूक एक, आडगाव दोन, श्रीधरनगर १२, विहीगाव एक, हिवरखेड नऊ, टेंभुर्णा तीन, नांदुरा ३२, विटाळी चार, तरवाडी दोन, वडनेर पाच, मलकापूर २१, कुंड खुर्द दोन, विवरा १७, तालसवाडा सहा, अंढेरा तीन, कुंभारी दोन, सुरा दोन, सिनगाव जहागीर चार, दगडवाडी दोन, दे. मही चार, पिंप्री आंधळे दोन, दे. राजा १८, आसलगाव तीन, पिं. देवी १४, धा. बढे चार, गोतमारा चार, गोलर दोन, पि. गवळी ७, मोताळा दोन, सिं. राजा सहा, दुसरबीड तीन, शेलगांव काकडे एक, मलकापूर पांग्रा एक, सुजलगांव एक, रताळी तीन, अंत्री देशमुख एक, जानेफळ दोन, हिवरा साबळे एक, लोणार एक, असोला एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक, यवतमाळमधील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील ७२ वर्षीय महिला आणि विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू; ३७९ ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:20 IST