पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २८ व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील दोन अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४०८ तर रॅपिड टेस्टमधील १४६ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा शहरात सहा, दे. राजा तालुक्यातील सिनगांव जहांगीर तीन, चिखली शहरात एक, चिखली तालुक्यातील उंद्री येथे एक, शेगांव दोन, शेगांव तालुक्यातील आळसणा येथे एक, टाकळी धारव एक, मोखा बाळापूर एक पॉझिटिव्ह सापडले आहेत. बुलडाणा तालुक्यातील बोरखेडी, येळगांव, गुम्मी येथे प्रत्येकी एक, मलकापूर शहरात तीन, मलकापूर तालुक्यातील कुंड बु. येथे एक, दसरखेड येथे चार, संग्रामपूर तालुक्यातील अकोली दोन, मोताळा शहर एक पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान लोणार येथील ६८ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
६९ रुग्णांची सुटी
जिल्ह्यातील ६९ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. खामगांव येथून १७, बुलडाणा २०, चिखली पाच, शेगांव १४, सिंदखेड राजा चार, मेहकर एक, लोणार पाच, नांदुरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.