पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर ४, निमखेडी १, बुलडाणा १३, वरवंड ३, कारखेड २, केळवद १, अमडापूर १, दिवठाणा १, सावरगाव डुकरे ३, साखरखेर्डा १, राजेगाव १, चिखली ७, देऊळगाव राजा १०, निवडुंगा ३, गव्हाण १, दे. घुबे १, देऊळगाव मही ३, जवळखेड १, अकोला देव १ या प्रमाणे ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. सोबतच नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे सोमवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात खामगावा कोविड केअर सेंटरमधून १०, देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधून १३, चिखलीमधून २, मेहकरमधून १, सिंदखेड राजा येथून ६, मोताला येथून ६, मलकापुरातून २, शेगावातून ६ आणि बुलडाण्यात ३ जणांना सुटी देण्यात आली.
तसेच आजपर्यंत १ लाख १२ हजार ६४८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अद्यापही ९६४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७७ झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात सध्या ३५० सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.