बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये चिखली पाच, अमडापूर एक, तेल्हारा एक, पळसखेड जयंती एक, शेळगाव आटोळ दोन, अन्वी एक, काठोडा दोन, जांबोरा एक, शेलापूर एक, मलकापूर सात, बेलाड एक, कुंबेफळ एक, पारखेड एक, खामगाव तीन, नांदुरा एक, शेंबा एक टाकळी एक, डिडोळा एक, बुलडाणा तीन, म्हसला एक, सागवन एक, मासरूळ एक, मौंढाळा येथील एकाचा समावेश आहे. शेंबा येथील एका ६८ वर्षीय बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.
दुसरीकडे ५२ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यात बुलडाणा पाच, मलकापूर सात, शेगाव नऊ, सिंदखेड राजा नऊ, नांदुरा तीन, देऊळगाव राजा चार, खामगाव दहा, संग्रामपूर एक, चिखली चार या प्रमाणे बाधीतांनी कोरोनावर मात केली.
८५,२९२ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८५ हजार २९२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ११ हजार ७७१ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही १,१६३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १२ हजार २६६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३६१ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १४८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.