पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये पिंपळगाव देवी दहा, बुलडाणा तीन, मासरूळ एक, देऊळगाव राजा पाच, दे. मही एक, सरंबा एक, मेरा एक, उंद्री एक, सातगाव भुसारी एक, हिवरा आश्रम एक, बाभुळखेड एक, मेहकर एक, मलकापूर दोन, खामगाव आठ, आंबेटाकली एक, गारडगाव एक, शेगाव शहर चार, पहुरजिरा एक, गव्हाण येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे बुलडाणा शहरातील रामनगरमधील ८२ वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधून एक, खामगाव तीन, नांदुरा पाच, जळगाव जामोद तीन, बुलडाणा दहा, मलकापूर नऊ आणि चिखली येथील सात जणांचा समावेश आहे.
८८,७४६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह
आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ८८,७४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२,१०९ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही १,६८६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२,४८६ झाली आहे. सध्या रुग्णालयामध्ये २२६ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, १५१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.