पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा नऊ, भादोला एक, बोराखेडी एक, चिखली दोन, चंदनपूर एक, चांधई एक, उंद्री एक, पारखेड एक, पिंपळगाव राजा चार, गोंधनापूर एक, खामगाव आठ, मेहकर एक, देऊळगाव राजा आठ, बोराखेडीमधील दोघांचा समावेश आहे. खामगाव शहरालगतच असलेल्या सजनपुरी येथील एका ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे ७ जानेवारी रोजी मृत्यू झाला. ५८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये मोताळा कोविड केअर सेंटरमधील आठ, देऊळगाव राजा १२, खामगाव १३, शेगाव चार, जळगाव जामोद दोन, चिखली पाच, संग्रामपूर एक, बुलडाणा चार, मेहकर दोन, मलकापूर दोन आणि नांदुरा कोविड केअर सेंटरमधील तीन जणांचा यात समावेश असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२ हजार ६२५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार ३४७ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
८४० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
७ जानेवारी रोजी ८४० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ८४३ झाली असून, यापैकी ३४० सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.