शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:32 PM

Buldhana News : गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनाही कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे अद्याप कुलूपबंद आहेत. उत्सवांवरही संक्रांत आली आहे. गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनाही कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. बाप्पा यंदा तरी सुखकर्ता हो, अशी विनवणी मूर्तिकार करीत आहेत.   सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने आहेत. चार फुटांपेक्षा मोठ्या गणेशमूर्तींना परवानगी नाही. ‘एक गाव, एक गणपती’ही संकल्पना गावोगावी राबविण्याबाबत शासन आग्रही आहे. पीओपीच्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अवघ्या एक ते दीड महिन्यावर गणेशोत्सव असला तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मूर्तिकारांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. रंगकामाला सुरुवात झाली आहे; पण उत्साह मात्र दिसून येत नाही. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. लाल माती बाहेरील राज्यातून आणावी लागत आहे. तिचेही दर वाढले आहेत. परिणामी, गणेशमूर्तीच्या दरात यंदा २५ टक्के वाढ होणार असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.मागील वर्षी तयार केलेल्या मोठ्या गणेशमूर्ती शिल्लक आहेत. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे आहे. त्यातच दोन- तीन लाखांचे भांडवल अडकून पडले आहे.

वर्षानुवर्षे गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र, दोन वर्षांपासून प्रचंड आर्थिक अडचणी आहेत. यंदा गणेशमूर्तीसाठी लागणारे साहित्य महागले आहे. वाहतुकीचे दर वाढलेले आहेत. परिणामी, मूर्तीचे दर वाढवावे लागणार आहेत. कोरोनाचे नियम आणि निर्बंधांचा फटका सामान्य मूर्तिकारांना सोसणार नाही. सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.-विनायक बावस्कर, अध्यक्ष, मूर्तिकार संघटना, बुलडाणा              

टॅग्स :buldhanaबुलडाणाGanesh Mahotsavगणेशोत्सव