जिल्ह्यात २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. उपचारानंतर हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
-शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी.
चाचणी कुठली?
कोरोनासाठी - आरटीपीसीआर
डेंग्यूसाठी - एलआयझा
सर्दी, खोकला व ताप
डेंग्यूची आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला येतो. अंगदुखी, डोकेदुखी, पोटात दुखणे, मळमळ होणे, डोळ्याच्या पाठीमागचा भाग दुखणे ही लक्षणे डेंग्यूची आहेत. अशीच लक्षणे कोरोनाचीही आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच चाचणी करून उपचार करणे गरजेचे आहे. उपचार पद्धती साधी आहे. अंगावर लक्षणे काढू नयेत, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार काळजी घेण्याची गरज आहे.
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
सध्या पावसाळा सुरू आहे. डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डेंग्यूचा आजार डासांपासून होतो. त्यामुळे डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्याने कोरडा दिवसही पाळता येत नाही. जलजन्य आजार होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. पाण्यामुळेच आजार होतात. त्यामुळे शुद्ध पाणी प्यावे. नळाचे पाणी पीत असाल तर उकळून प्यावे, असाही सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे.
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ - ३८
२०२० - २२
२०२१ (जुलैपर्यंत) - ७