बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेम क्वारंटाईन राहण्याची सूट देण्यात येते़ ग्रामीण भागातही अनेक रुग्ण हाेम क्वारंटाईन असले तरी त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते गावभर फिरून काेराेनाचा प्रसार करीत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे़
गत काही दिवसांपासून शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ लक्षणे नसलेल्या अनेक पाॅझिटिव्ह रुग्णांना आराेग्य विभागाच्या वतीने हाेम क्वारंटाईन राहण्याची मुभा देण्यात येते़ या सवलतीचा अनेक गावातील हाेम क्वारंटाईन रुग्ण दुरुपयाेग करीत असल्याचे चित्र आहे़ रुग्णांवर कुणाचाही वाॅच नसल्याने ते गावभर फिरत आहेत़ तसेच पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लाेकांचा शाेधही घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़ गतवर्षी काेराेना रुग्ण पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लाेकांची चाचणी करण्यात येत हाेती़ यावर्षी मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त धाेकादायक ठरत असलेल्या काेराेनाच्या नव्या स्टेननंतरही पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचा शाेध घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, शहरांबराेबरच गावांमध्येही काेराेना सुसाट वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे़
समित्या कागदावरच
गतवर्षी हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या हाेत्या़
यावर्षी अनेक गावांमध्ये समित्या कागदावरच आहेत़
हाेम क्वारंटाईन रुग्णांवर अंगणवाडी सेविका, आराेग्यसेविका, पाेलीस पाटील, सरपंच, आदी स्थानिक कर्मचारी, अधिकारी, लाेकप्रतिनिधींनी लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र, रुग्णांवर लक्ष देण्यासाठी कुणाकडेही वेळ नसल्याचे चित्र आहे़
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला खाे
काेराेनाचे संक्रमण वाढल्यानंतर गेल्या वर्षी पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आठ ते दहा लाेकांची चाचणी करण्यात येत हाेती़ मात्र, केवळ जवळच्या संपर्कातील म्हणजे कुटुंबातील लाेकांचीच चाचणी करण्यात येते़ तसेच स्राव दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी काेराेना तपासणीचा अहवाल येताे़ त्यामुळे, हे रुग्ण आधीच गावात फिरलेले असतात़ त्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येताे़ अशा लाेकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आराेग्य विभागाला कसरत करावी लागत आहे़
आराेग्य यंत्रणा हतबल
शहरांसह ग्रामीण भागात माेठ्या संख्येने काेराेना रुग्ण वाढत आहेत़ काेविड सेंटर हाऊसफुल्ल झाल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेम क्वारंटाईन ठेवण्याशिवाय आराेग्य विभागाकडे दुसरा पर्याय नाही़ तसेच रॅपिड टेस्टसाठी विशेष शिबिरे घेण्यात येतात़ या शिबिरांमध्ये केवळ पाॅझिटिव्ह रुग्णांना काेविड सेंटरमध्ये रेफर केले जाते़ या पाॅझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत नाही़ दरराेज रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे़