- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी खामगावात शासकीय आणि खासगी डॉक्टरांचा विशेष (कार्यदल) ‘टास्क फोर्स’ तयार केला आहे. नवजात शीशू आणि बालकांवर उपचारासाठी शहरातील सर्वच खासगी बालरोग तज्ज्ञ उपजिल्हा रूग्णालयात सेवा देतील. त्याअनुषंगाने खामगाव सामान्य रूग्णालयात बालकांसाठी स्पेशल कोविड वार्डाची निर्मिती करण्यात आली आहे.कोरोना महामारीची तिसरी लाट थोपविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एकीकडे चाचण्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी बालकांना तिसºया लाटेचा धोका अधिक असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे खामगाव येथील सामान्य रूग्णालयात खासगी आणि शासकीय रूग्णालयातील डॉक्टर्स एकत्रित सेवा देणार आहेत. यासाठी खासगी आणि शासकीय १८ डॉक्टरांचा समावेश असलेले कोरोना आपातकालीन कृतीदल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. तिसºया लाटेचा धोका लक्षात घेता, शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खामगाव सामान्य रूग्णालयात बालकांसाठी विशेष कोविड वार्ड तयार करण्यासाठी अत्यावश्यक संसाधन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा बुलडाणा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात खामगाव येथील सामान्य रूग्णालय अधिक्षकांनी चिकित्सकांना पत्र दिले आहे.
उपविभागीय अधिकायांनी घेतला आढावा!कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसºया लाटेच्या अनुषंगाने शहरातील बालरोग तज्ज्ञांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन अॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्सचे पदाधिकारी उपस्थित होते. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरि वडोदे आणि शहरातील खासगी आणि शासकीय बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.