गावातील सहा जण आले पॉझिटिव्ह
डोणगाव : येथे एकाच दिवशी १४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये गावातील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या डोणगाव परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण शोधण्यासाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी कोरोना चाचणीची मोहीम सुरू केली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहेत. ७ एप्रिल रोजी एकाच दिवशी १४० जणांच्या कोरोना चाचण्या करून घेतल्या. यामध्ये ८ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने डोणगाव परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी स्वत:हून करून घ्यावी व प्रशासनाचे नियम पाळावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी केले आहे.