बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख असून या लोकसंख्येपैकी आतापर्यंत १ लाख ५५ हजार ७२८ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. यापैकी तब्बल १४ टक्के चाचण्या या गेल्या दहा दिवसांत करण्यात आल्या आहेत. १४ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात १,३४ हजार १०६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र १० दिवसांचा विचार करता जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १३ टक्क्यांवर स्थिर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले
गेल्या १० दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. १४ फेब्रुवारीला ते ९५.२७ टक्के होते. आज ते ८५.७३ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले असले तरी ९६४ जणांनी या कालावधीत कोरोनावर मात केली आहे.
असे वाढले १० दिवसांत रुग्ण
पॉझिटिव्ह रुग्ण : २,७७३
बरे झालेले : ९६४
मृत्यू : १५
ॲक्टिव्ह रुग्ण : १,७९४
-----
-- याप्रमाणे झाल्या चाचण्या--
आरटीपीसीआर- १४,६०५
ट्रुनॅट :- ८२८
रॅपिड :- ६,२०८
एकूण :- २१,६२२