सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा १६, पाडळी दोन, हतेडी खुर्द ३, खामगाव २४, सुटाळा २, आलमपूर ३, खरकुंडी २, अवधा ५, मलकापूर ३८, उमाळी २, हरसोडा ५, वाघुड २, चिखली १०, शेलगाव आटोळ २, सिं. राजा ६, साखरखेर्डा १६, शेंदुर्जन ३, दुसरबिड ३, वारोडी २, सावखेड तेजन २, सायाळा २, धा. बढे ११, आव्हा २, लिहा ३, मोताळा २, शेगाव ७, दे. राजा ८, लोणार ९, बिबी ४, चोरपांग्रा ३, तांबोळा २, लोणी २, पळसखेड २, वाघाळा ७, मेहकर १३, नांदुरा १०, जळगाव जामोद ८, आसलगाव ६, पि. काळे २, निंभोरा २, पळशी सुपो ३, आडोळ २, जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील निंबोरा २, अकोला जिल्ह्यातील व्याळा येथील एक, जाफराबाद येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, खामगावातील शिवाजीनगर भागातील ७५ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील पोटा येथील ४५ वर्षीय पुरुष व जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे ८६३ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आतापर्यंत ४० हजार ७९५ जणांनी कोरोनावर मात केली, तर दोन लाख ७३ हजार ९९ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
--५४२६ सक्रिय रुग्णांवर उपचार--
सध्या जिल्ह्यात ५,४२६ सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४६ हजार ५३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तीनजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८८ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर सध्या ०.६६ टक्के आहे.