पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९०, खामगाव तालुक्यातील ५८, शेगाव तालुक्यातील ५, देऊळगाव राजा तालुक्यातील ५९, चिखली तालुक्यातील ७५, मलकापूरमध्ये ४५, नांदुऱ्यामध्ये ७०, लोणारमध्ये ५३, मोताळ्यात ५३, जळगाव जामोदमध्ये ७७, सिंदखेड राजामध्ये २२ आणि संग्रामपूर तालुक्यात ३४ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील ३७ वर्षीय महिलेचा आणि खामगाव तालुक्यातील रोहणा येथील ७९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दरम्यान १,१५३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--३,७४,५८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ७४ हजार ५८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासोबतच ६२ हजार ९३७ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ७ हजार ७१३ संदिग्धांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६८ हजार ८४४ झाली आहे. त्यापैकी ५,४५८ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.