प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी गौलखेड एक, घुई एक, चिंचोली १३, शेगाव २०, बुलडाणा ४०, सुंदरखेड तीन, तांदुळवाडी एक, पळसखेड भट एक, चिखली २८, लोणी लव्हाळा एक, अमडापूर दोन, किन्होळा एक, शेलगाव एक, चांधई एक, सवणा एक, मेरा एक, शिरपूर दोन, खामगाव २८, शिर्ला नेमाने एक, सुटाळा बुद्रूक एक, आडगाव दोन, श्रीधरनगर १२, विहीगाव एक, हिवरखेड नऊ, टेंभुर्णा तीन, नांदुरा ३२, विटाळी चार, कोळंबा एक, तरवाडी दोन, शेंबा एक, वडनेर पाच, मलकापूर २१, कुंड खुर्द दोन, वडजी एक, वाघोळा एक, विवरा १७, दाताळा एक, तालसवाडा सहा, आळंद एक, अंढेरा तीन, कुंभारी दोन, सुरा दोन, सिनगाव जहागीर चार, नारायणखेड एक, जांभोरा एक, निमखेड एक, दगडवाडी दोन, पिंपळगांव एक, दे. मही चार, पिंप्री आंधळे दोन, दे. राजा १८, आसलगाव तीन, गाडेगाव खुर्द एक, पिं. देवी १४, धा. बढे चार, पोफळी एक, गोतमारा चार, गोलर दोन, पि. गवळी ७, मोताळा दोन, सिं. राजा सहा, जऊळका एक, दुसरबीड तीन, शिवणी टाका एक, सवडत एक, शेलगांव काकडे एक, मलकापूर पांग्रा एक, सुजलगांव एक, रताळी तीन, अंत्री देशमुख एक, जानेफळ दोन, हिवरा साबळे एक, लोणार एक, असोला एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक, यवतमाळमधील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील ७२ वर्षीय महिला आणि विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
--७५८१ अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही ७ हजार ५८१ संदिग्धांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ३०४ झाली आहे. यापैकी २,६६९ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे २०० जणांचा मृत्यू झाला आहे. ३३८ जणांनी रविवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्यांपैकी १ लाख ४९ हजार ३०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १८,४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.