मेहकर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संशोधकांनी अथक परिश्रमानंतर कोव्हीडची लस संशोधित केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हामधील घाटबोरी सारख्या ग्रामीण आदिवासी बहुल गावात कोव्हीडचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शंकर साखरकर यांनी गावातील ४५ वर्षाच्या पुढील वयोगटातील महिला व पुरुष यांना कोविड लसीकरणाचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे शासकीय आश्रम शाळेत पहिला टप्पात महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवुन अगोदर रॅपिड टेस्ट व नंतर लस टोचुन घेतली. यावेळी ग्रामविकास अधिकारी शंकर साखरकर, महसुल मंडल अधिकारी गजानन ढोके, तलाठी संजय शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मगर व डॉ रविंद्र साठे, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका उपस्थित होते. कोरोनापासून सुरक्षिततेसाठी ही लस वेळेत आणि कोणतीही भिती न बाळगता घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी मंडळ अधिकारी गजानन ढोके, तलाठी संजय शेळके, ग्रामसेवक शंकर साखरकर, डॉ. विशाल मगर, डॉ. रविंद्र साठे, नर्स एस. डी. लेंडे, आरोग्य सेवक नागरे, संतोष सेवलकर, गवळी, पोलीस पाटील संजय चोंडकर, आंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
घाटबोरी येथे कोरोना लसीकरण मोहीम - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:36 AM