लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोविड लसीकरणाचा आज देशभर शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी सहा केंद्रावर ६०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले हाेते. त्यापैकी ५७५ जणांना लस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह आराेग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. लसीकरण सत्रात पहिली लस बुलडाणा येथील डॉ. सोनाली मुंढे-इलग यांना देण्यात आली. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यात बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय सोबतच शेगाव, दे. राजा, खामगाव, चिखली व मलकापूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.पहिल्या टप्यात १४ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली असून जिल्ह्याला १९ हजार डाेस मिळाले आहेत. सहा केंद्रावर नियमीत लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
लसीकरणात जिल्हा राज्यात दुसराखामगाव : कोरोनाला रोखण्याकरिता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. राज्यात सर्वाधिक लसीकरणासाठी दिलेले लक्ष्य हिंगोली जिल्ह्याने १०० टक्के पूर्ण केले असून, बुलडाणा जिल्ह्याने ९५ टक्के लक्ष्य पूर्ण केले असून, जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. संपूर्ण जगाला वेठीस धरणाºया कोविड १८९ विषाणूविरूद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला राज्यात शनिवारी प्रारंभ करण्यात आला.