देऊळगाव राजा : येथील डॉ. अन्वय देशपांडे हे जिल्हा शासकीय रुग्णालय, जालना येथे कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये शहर व तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना जालना येथे उपचार करून बरे केल्याबद्दल शहरातील श्री बालाजी महाराज मित्रमंडळातर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. सिव्हील कॉलनी येथील निवासस्थानी डॉ. अन्वय देशपांडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
शहरातील युवा डॉक्टर अन्वय देशपांडे हे जालना येथील शासकीय रुग्णालयात सेवेत आहे. त्यांचे वडील प्रा. विनायक देशपांडे हे दे राजा हायस्कूल येथे प्राध्यापक आहेत तर आई सुरेखा देशपांडे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. डॉक्टर देशपांडे व त्यांच्या टीमने जालना येथील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले व त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत श्री बालाजी महाराज मित्रमंडळातर्फे त्यांच्या सिव्हिल कॉलनी येथील निवासस्थानी डॉ. अन्वय देशपांडे त्यांचे आई-वडील, आजी, आजोबा व काका यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार व श्री बालाजी महाराज यांची फोटो प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत सुरज गुप्ता यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अन्वय देशपांडे, प्राध्यापक विनायक देशपांडे, सुरेखा देशपांडे, दत्तात्रय देशपांडे, सुमती देशपांडे, सिद्धेश्वर देशपांडे, ओम देशपांडे हे परिवारातील सदस्य तसेच श्री बालाजी मित्रमंडळातर्फे नगरसेविका पल्लवी मल्हार वाजपे, सामाजिक कार्यकर्ते मल्हार वाजपे, अशोक जोशी, सुरज गुप्ता, राजेश सपाटे, सुरेंद्र अंबुस्कर, नितीन जपे, बाबू जोशी, टिंकू वालेकर, शांताराम भाग्यवंत आदी उपस्थित होते.