नाना पटोले यांचे ९ जून रोजी मेहकरनगरीत आगमन होताच नगराध्यक्ष कासम गवळी यांनी त्यांचे स्वागत केले. मेहकर येथील खंडाळा बायपासवर या स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंचकावर जेसीबीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. एक क्विंटल फुलांनी बनविलेल्या हाराने, तसेच शाल व चांदीची गदा देऊन कासम गवळी यांनी नाना पटोले यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभ कार्यक्रमाला त्यांच्या सोबत आ. वजाहात मिर्झा, कार्यकारी अध्यक्ष म.प्र.काँ.क. कुणाल पाटील, उपाध्यक्ष म.प्र.काँ.क. संजय राठोड, अतुल लोंडे, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग विजय अंभोरे, समन्वयक राजाभाऊ देशमुख, प्रदीप नागरे यांची उपस्थिती होती. मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी हे कोरोनाकाळामध्ये जी काँग्रेसची विचारधारा आहे, त्यानुसार काम करीत असल्याचे मत पटोले यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाला लोणारचे नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, प्रदीप संचेती, ॲड. शैलेश देशमुख, जिल्हा मुस्लीम कोअर कमिटीचे ॲड. मजीद कुरेशी मलकापूर, मो. वसिमोद्दीन, दादूसेठ चिखली, ॲड. शहजाद उल्ला खान लाखनवाडा, इब्राहिम खान, मो. नईम, अफजल अनवर शेख, तुफैल खान, अन्नू, बादशाह खान, समद भाई, फिरोज खान, शे. असलम, जैनुलआबदीन, शेख रहेमान कुरेशी, सदस्य मो. अलीम ताहेर, राजेश अंभोरे, पंकज हजारी, अलियार खान, मुजीब खान, नीलेश मानवतकर, संजय ढाकरके, नीलेश सोमण, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, गणेश मोसंबे, मा. नगरसेवक मुजीब हसन कुरेशी, उस्मान शहा उपस्थित होते. संचालन प्रा. गणेश बोचरे यांनी केले.
===Photopath===
100621\1639-img-20210610-wa0013.jpg
===Caption===
लुपिन फाऊंडेशन मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट करण्यात आले. (छाया - मनोज वारंग ).