साखरखेर्डा ०येथून जवळच असलेल्या गुंज येथील हभप माणिकराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गुंज ते पैठण दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते . यावर्षी मात्र कोरोना संसर्गजन्य आजारामुळे दिंडी सोहळा रद्द करुन गावातूनच संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित केला आहे .
गुंज येथील मानिकराव ढवळे महाराज यांना वयाच्या १० व्या वर्षांपासून हरी भक्तीची ओढ लागली होती . दरवर्षी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या सोहळ्यात सोपान काका. दिंडीत मानाची पालखी म्हणून अग्रस्थानी असते . हभप माणिकराव ढवळे महाराज यांच्या नंतर आजही ती परंपरा त्यांची मुलगी हभप भागिरथी बाई नित्यनियमाने सांभाळीत आहे . हभप माणिकराव ढवळे महाराज यांच्या निधना नंतर भागिरथी बाई यांनी नाथशष्टी निमीत्त दरवर्षी पैठणला दिंडी सोहळ्याचे आयोजन करतात . मागील वर्षी सुध्दा आयोजन केले होते . परंतू कोरोना संसर्गजन्य आजार फैलावू नये म्हणून शासनाने यांत्रा महोत्सवावर बंदी घातली होती . त्यामुळे जालना येथील दत्त मंदिरातुन दिंडीला परत फिरावे लागले होते . यावर्षी सुध्दा कोरोना संक्रमण वाढल्याने दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे . गावातच नाथ महाराज आणि भानुदास महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित करुन जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती हभप भागीरथीबाई ढवळे यांनी लोकमतला माहिती दिली .
फोटो :--- नाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघत असलेला पालखी सोहळा .