बुलडाणा: शेगाव आणि खामगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी इंडोनेशिया आणि मलेशियातून आलेल्या १२ विदेशी नागरिकांना आरोग्य विभागाने क्वारंटीन व विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. यातील तीन जणांना सर्दी, कफ व तापाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांना खामगाव येथील विलगीकरण कक्षात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित नऊ जणांना बुलडाणा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयातील क्वारंटीन (विलगीकरण) कक्षात ठेवण्यात आले आहे.१५ मार्च रोजी विदेशातील हे नागरिक शेगाव व खामगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. सोबतच त्यांनी खामगाव येथील एक धार्मिक स्थळ गाठल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाच्या पथकाने या नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी तिघांना ताप, सर्दी व कफाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना त्वरित खामगाव येथील विलगीकरण कक्षात(आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित नऊ जणांना क्वारंटीनसाठी (विलगीकरण) बुलडाणा येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आगामी १४ दिवस त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येणार आहे. दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून ताप, सर्दी त्यांना आहे किंवा नाही, याचा अहवालही नियमित स्वरुपात घेण्यात येणार आहे. एकीकडे चिखलीतील वृद्धाचा मृत्यू कोराना मुळे झाला नसल्याचे स्पष्ट झालेले असतानाच आता नव्याने विदेशी १२ नागरिकांना आरोग्य विभागाने मॉनिटरींगखाली घेतले आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथे आयसोलेशन वार्ड उभारण्यात आले असून बुलडाणा येथे एक क्वारंटीन (विलकीकरण कक्ष) उभारण्यात आलेला आहे.
एका अल्पवयीन मुलाचाही समावेशइंडोनेशियातून सात आणि मलेशियातून पाच विदेशी नागरिकांचे आरोग्य विभागाने मॉनिटरींग सुरू केले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आगामी १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगरानीमध्ये राहतील. कोरोना व्हायरसचाही रिस्क पिरेड हा साधारणत: १४ दिवसांचा असतो.