शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

CoronaVirus : अफवा पसरविणाऱ्यांवर २४ तास नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:11 AM

अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १७६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा : कोरोनाची भीती सर्वांमध्येच निर्माण झाली आहे. ही दशहत वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर काही लोकांकडून होत आहे. कोरोना बाबत अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १७६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाबत समाजमाध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्यांवर सध्या सयबर सेल २४ तास नजर ठेवून आहे.कोरोनामुळे सर्व देश हादरला आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभागासह शासनाच्या विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कोरोना निर्मुलनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या उपाययोजनाचे उल्लंघनही काही नागरिकांकडून होत आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची चर्चा असल्याने सोशल मीडियावरही कोरोनाबाबतच्या विषयांना हवा मिळत आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, टिष्ट्वटर, टीक टॉक यासारख्या समाजमाध्यमावरून कोरोनाबाबतचे संदेश व्हायरल होत आहेत. परंतू यामध्ये काही संदेश अफवा पसरविणारे राहत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची अधिक भीती घालून दिल्या जात आहे. सोशल मीडियावरून कोरोनाबाबतच्या अशा अफवा पसरविणाºयांवर महाराष्ट्राचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. याप्रकरणी ९ एप्रिल पर्यंत विविध पोलीस स्टेशनमध्ये १६१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये सातत्याने वाढ होत असून, आतापर्यंत राज्यात १७६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपीची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातही पाच गुन्हेबुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही कोरोना बाबत अफवा पसरविण्याचे प्रकार समोर येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करून अफवा पसरविणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जामोद, खामगाव (शिवाजी नगर), चिखली, बुलडाणा तालुक्यातील रायपूर व मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सोशल मीडियावरून कोरोनाबाबत अफवा पसरविणाºयांवर सोशल मीडिया मॉनीटरींग सेल लक्ष ठेवून आहे. २४ तास सायबर सेलची नजर असते. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोट्या, दिशाभूल करणाºया अफवा पसरू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-दिलीप भूजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcyber crimeसायबर क्राइमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस