लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शुक्रवारी पुन्हा २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्ण संख्या ६९६ वर पोहोचली आहे. दरम्यान, यापैकी ३१० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये ३६६ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.खामगाव आणि देऊळगाव राजा तालुक्यात प्रत्येकी सात, शेगाव तालुक्यात चार, चिखली आणि जळगाव जामोदमध्ये मध्ये प्रत्येकी दोन मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एक, लोणार तालुक्यातील सुलतानपूर, सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ, मोताळा तालुक्यातील कोथळी आणि मलकापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. खामगावमध्ये बाळापूर फैलमध्ये चार, शिवाजीनगरात दोन, देशमुख प्लॉटमध्ये एक या प्रमाणे सात रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.देऊळगाव राजा शहरात दोन, जुन्या नगर परिषदेजवळ तीन, अहिंसा मार्गावर दोन महिला, शेगाव येथे देशमुखपुरा भागात तीन, धनगर फैलमध्ये एक या प्रमाणे सात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. चिखलीतील डिपीरोड परिसरात दोन पॉझिटिव्ह आहेत.दुसरीकडे प्रयोग शाळेत पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासण्यात आलेल्या एकूण २९६ अहवालांपैकी २६९ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर २७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोग शाळेतून प्राप्त अहवालांपैकी चार तर रॅपीड टेस्टमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये नांदुरा येथील सहा, बुलडाण्यातील इकबाल चौक परिसरातील एक, खामगावातील तीन, शेगावातील आरोग्य कॉलनीमधील दोन, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पाच हजार ८४४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एकूण बाधीतांपैकी ३१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्यापही ९४ नमुन्यांची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६९६ झाली आहे.
कोथळी व बुलडाण्यात आठ क्वारंटीनकोथळी : मोताळा तालुक्यातील कोथळी येथेही एक ३८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सायकलशी संबंधीत व्यवसाय करणारा हा व्यक्ती मध्यंतरी बुºहाणपूर येथे गेला होता. त्याला त्रास होत असल्याने रुग्णालयात त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. या व्यक्तीच्या संपर्कातील कोथळी येथील चार आणि बुलडाणा येथील चार अशा एकूण आठ नातेवाईकांना आरोग्य विभागाने क्वारंटीन केले आहे. येत्या दोन दिवसात या आठ व्यक्तींचे तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे.