लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी ५५ जण कोरोना बाधीत आढळून आले असून नांदुरा येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची एकूण संख्या ७,९६९ झाली असून त्यापैकी ६२४ बाधित रुग्णांवर प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या अहवालापैकी ३९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ५५ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले. यामध्ये जळगाव जामोद दोन, कुरणखेड एक, मलकापूर दोन, बेलाड एक, नांदुरा दोन, शेगाव एक, वढव दोन, मांडवा एक, चिखला एक, राजणी एक, सरस्वती दोन, देऊळगाव कुंडपाल एक, गुंजखेडा दोन, लोणार सात, देऊळगाव राजा एक, मोताळा एक, सावरगाव एक, बोराखेडी ेक, बुलडाणा १२, तांदुळवाडी दोन, रिधोरा एक, गुंजाळा चार, मेरा बुद्रूक एक, शेलगाव एक, चिखली दोन, खामगाव एक आणि जालना जिल्ह्यातील राजूर येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान नांदुरा येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०५ झाली आहे.दरम्यान, १८१ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोवीड केअर सेंटरमधील ४८, शेगाव १४, सिंदखेड राजा १९, देऊळगाव राजा १३, नांदुरा २०, जळगाव जामोद एक, लोणार २०, बुलडाणा चार, चिखली १३, मलकापूर ११, मोताला पाच, मेहकर १२ आणि संग्रामपूर कोवीड केअर सेंटरमधून एकाने कोरोनावर मात केली.