लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार २२२ वर पोहचली आहे. २ हजार २६५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.सध्या जिल्ह्यात ९०९ रुग्णांवर विविध रुग्णालयांमघ्ये उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी ९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४१५ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३२५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७७ व रॅपिड टेस्टमधील ११ अहवालांचा समावेश आहे.पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील चार , बाळापूर फैल एक, आठवडी बाजार दोन, जलालपूरा एक, रेखा प्लॉट एक, केला नगर एक, दंडस्वामी मंदीराजवळ एक, गोपाल नगर एक, किसन नगर एक, सती फैल एक, चांदमारी एक, खामगांव तालुक्यातील लाखनवाडा एक, शिरसगांव दे. एक, घाटपुरी नउ , निमकवळा तीन, अटाळी दोन, जळगांव जामोद तालुक्यातील पिं. काळे येथे चार, खेर्डा खु येथील एक , जळगांव जामोद शहरातील दोन , नांदुरा शहरातील राहुल टॉवर दहा, नांदुरा तालुक्यातील निमगांव येथील नउ , शेगांव तालुक्यातील माटरगांव येथील एक, शेगांव शहर पोलीस स्टेशन एक, बुलडाणा शहरातील पाच , बुलडाणा ता. धाड येथील एक, दे. राजा शहरातील ११ , दे. राजा तालुका मेंडगांव एक, दिग्रस एक, लोणार तालुक्यातील सुलतानपूर एक, लोणार शहरील तीन , चिखली तालुका आमखेड एक, मेहकर ता. आरेगांव एक, मलकापूर शहरातील दादावाडी नगर एक, गांधी चौक एक, आदर्श नगर एक, आंचल जि. वाशिम येथील एकाचा समावेश आहे.
दोन हजार २६५ रुग्णांची कोरोनावर मातआजपर्यंत १८ हजार १०१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील १२३० नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण तीन हजार २२२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी दोन हजार २६५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ९०९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.