लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या ४० दिवसापासून कोरोना संसर्गाच्या ससेमिऱ्यात अडकलेला बुलडाणा जिल्हा आज एक प्रकारे कोरोना मुक्त झाला असून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तिघांना दहा एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा येथील कोरोना सुश्रूषा केंद्रातून सुटी देण्यात आली.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात आता एकही कारोना बाधीत रुग्ण राहलेला नाही. परिणामी आता बुलडाणा जिल्ह्याची ग्रीनझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे.आगामी २८ दिवस एकही कारोना बाधीत रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून न आल्यास बुलडाणा जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाऊ शकतो. त्यादृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर अधिक सतर्कता राखण्यात येत आहे.पश्चिम वºहाडात कोरोना संसर्गामुळे बुलडाणा जिल्ह्यात पहिला बळी गेला होता. त्यामुळे केद्र शासनासमोबतच राज्य शासनाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा एक संवेदनशील जिल्हा म्हणून समोर आला होता. त्यानंतर सातत्याने बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडत गेले ही सख्या २४ वर पोहोचली होती. बुलडाणा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी शेवटचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले होते. धर्मप्रचारक म्हणून बुलडाणा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातीली कामठी येथून आलेल्या ११ पैकी तीन जण कोरोना पाझीटीव्ह आल्यामुळे बुलडाण्याची ग्रीन झोनकडे असलेली वाटचाल अचानक आॅरेंज झोनमध्ये परावर्तीत झाली होती. अखेर दहा एप्रिल रोजी या तीनही जणांचे सलग दोन रिपोर्ट १३ व्या दिवशी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात सध्या एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे ४० दिवसानंतर आरोग्य यंत्रणेने काही काळ का होईना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागासह सर्व्हेक्षणासाठी (अॅक्टीव्ह सर्व्हीलन्स) जवळपास १२०० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांचे हे यश आहे, असे म्हणावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नसला तरी नागरिकांनी गाफील राहू नये.
आतापर्यंत ७४८ जणांच्या तपासण्याआतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.२४ जण पॉझीटीव्ह आढळून आले होते. यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान, सापडलेले उर्वरित २३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ स्वॅब नमुन्याचे अहवाल अकोला प्रयोग शाळेत प्रलंबी आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील ११ प्रतिबंधीत क्षेत्राताली ९२ हजार ५४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.