लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून २२ आॅगस्ट रोजी आणखी ८६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १९९ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून ४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या २५५७ वर पोहचली असून ८८२ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २८५ अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहेत. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये मेरा बु ता. चिखली येथील सात, चिखली येथील आठ, शिंदी हराळी ता. चिखली येथील एक, सवणा ता. चिखली येथील एक, मेहकर येथील सहा , चायगांव ता. मेहकर येथील तीन , नागापूर ता. मेहकर : येथील एक, मलकापूर शहरातील चैतन्यवाडीतील दोन , शिवाजी नगर एक, सुलतानपूर ता. लोणार येथील नउ, मातमळ ता. लोणार येथील एक, दे. राजा येथील चार, धाड ता. बुलडाणा येथील एक , बुलडाणा सहा , विष्णूवाडी दोन, पैनगंगा अपार्टमेंट एक, धा. बढे ता. मोताळा येथील एक, पोफळी ता. मोताळा येथील एक , नांदुरा शहरातील नवाबपुरा येथील चार, पीएससी जवळील एक, पोलीस स्टेशन रोड दोन , संकल्प कॉलनी एक, खामगांव येथील वाडी एक , घाटपुरी नाका पाच, निळकंठ नगर तीन, किसान नगर पाच, शंकर नगर दोन, शेगांव : सुरभी कॉलनी एक, शिवाजी नगर एक, ताडपुरा एक, धानुका एक, व्यंकटेश नगर एक, मावंदीर ता. संग्रामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
१५ हजार ३४ अहवाल निगेटिव्हआजपर्यंत १५ हजार ३४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १६३४ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी २०४ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १५ हजार ३४ आहेत. जिल्ह्यात एकूण २५५७ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १, ६३४ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केली.