शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

CoronaVirus In Buldhana : ५४ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:59 AM

५४ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून १६ मे रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा : आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेल्या काही शिथीलतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यामुळे संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याचेही प्रमाण वाढत आहे. अशाच ५४ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून १६ मे रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.अकोला येथील प्रयोग शाळेतून जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी दहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव जामोद, नांदुरा येथील संदिग्धांसह दिल्ली तथा अन्य राज्यातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. कोवीड रुग्णालयात सध्या दोन कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास ५४ जणांचे स्वॅब नमुन्याचे अहवाल अद्याप अकोला येथील प्रयोग शाळेतून अद्याप प्राप्त झालेले नाही. प्रसंगी उद्या ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने मलकापूर पांग्रा येथील कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात आलेल्या २२ जणांसह अन्य काही संदिग्धतांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ८२३ व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आले असून १५ मे रोजी जवळपास ४४ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या