लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढतच असून बुधवारी पुन्हा जळगाव जामोद येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ही ४९ झाली असून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ती पोहोचली आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात तब्बल १०७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर आता भर देण्यात येत आहे.बुधवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट मिळून एकूण ४६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३६१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मेहकर सात, सिं. राजा आठ, मोताळा चार, लोणार सात, जळगाव जामोद ११, बुलडाणा १५, चिखली पाच, मलकापूर एक, देऊळगाव राजा १५, शेगाव पाच, खामगाव चार, लाखनवाडा दोन, मेरा बुद्रूक एक, जांभोरा एक, भरोसा तीन कोनड दोन, टाकळी विरो दोन, बोराखेडी एक, रोहीणखेड एक, साखरखेर्डा एक, मलकापूर पांग्रा एक, सावरगाव एक, सोमठाणा एक, माळविहीर एक, वरवंड एक, नांदुरा दोन, शिराढोण १, सुलतानपूर एक, सरंबा एक, मेंडगाव एक या प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान जळगाव जामोद येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी ४१ जण कोरोनामुक्तदुसरीकडे बुधवारी ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येथील दहा, नांदुरा येथील पाच, खामगावातील एक, चिखलीमधील तीन, शिंदी हराळी येथील दोन, देऊळगाव मही येथील एक, देऊळगावराजा शहरातील सात, भालेगाव येथील तीन, दुसरबीड येथील दोन, हिवरखेड येथील तीन, साखरखेर्डा येथील एक, चायगाव येथीलएक, मेहकरमधील एक आणि पिंपळगाव काळे येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, संदिग्ध असलेल्या १८ हजार ४६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे तर आतापर्यंत जिल्ह्यातील २,३०६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मात्र अॅक्टीव रुग्णंचा आकडा आता हजाराच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.