लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून २३ आॅगस्ट रोजी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे तर २३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २५८०वर पोहचली असून ८५० जणांवर उपचार सुरू आहेत. ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पॉझीटीव्ह आलेले रुग्णांमध्ये दसरखेड येथील एक , बुलडाणा येथील तीन , चिखली येथील एक, भालगांव ता. चिखली येथील एक, लोणार येथील दोन , बिबी. ता लोणार येथील एक, दे. राजा येथील ९, शेगांव सदगुरू नगर येथील एक , गजानन सोसायटी येथील चार जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आज बिबी ता. लोणार येथील ३८ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.तसेच आजपर्यंत १५ हजार १४७ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत आजपर्यंत १६८८ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ५८७ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १५ हजार १४७ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण २५८० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १ हजार ६८८ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८५०कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
बिबी येथील हॉटेल व्यवसायीकाचा कोरोनाने मृत्यूबिबी : येथील ३८ वर्षीय हॉटेल व्यवसायीकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी घडली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात सात दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. सदर तरुणास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु सदर इसमाचा मृत्यू झाल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.