लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ४,५९७ झाला असून शुक्रवारी १४५ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर खामगाव येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टचे एकूण ५५६ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४२० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १०४ तर रॅपीड टेस्टमधील ४१ अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव दहा, देऊळगाव राजा नऊ, गारगुंडी चार, सावरगाव जहाँगीर एक, देऊळगाव मही पाच, गारखेड ५, पांग्री एक, बुलडाणा दहा, सागवन एक, चिखली सात, खंडाळा एक, चांधई तीन, देऊळगाव घुबे ेक, मलकापूर आठ, कुंड बुद्रूक एक, विवरा एक, तालसवाडा एक, मेहकर तीन, लोणी गवळी एक, डोणगाव सहा, जांभूळ एक, चिखला एक, नांदुरा १२, जळगाव जामोद चार, खेर्डा एक, गोंधनखेडा एक, रताळी एक, टुनकी एक, वरवट बकाल एक, संग्रामपूर तीन, आव्हा एक, निपाना एक, मोताळा तीन , वडनेर दोन, निमगाव सहा, बेलुरा ेक, लोणार एक, जलंब एक, जवळा एक, आडसूळ एक, भोनगाव एक, शेगाव १ या प्रमाणे बाधीत रुग्ण आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील व अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील प्रत्येकी एक कोरोना बाधीत आहे.
१६८ जणांची कोरोनावर मातशुक्रवारी १६८ कोरोना बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये मेंडगाव एक, दिग्रस एक, शेगाव पाच, नांदुरा एक, मलकापूर चार, खामगाव २०, चिखली पाच, चांधई एक, मोहाडी एक, आमखेड एक, सोमठाणा एक, मेरा बुद्रूक एक, जांभोरा एक, भरोसा तीन, कोनड दोन, बागाव एक, साखरखेर्डा एक, बुलडाण्यामधील २२ जणांसह अन्य व्यक्तींचा समावेश आहे.