- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश जिल्ह्यातील बँकाची वेळ सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जुन्याच वेळेनुसार बँका सुरू असल्याने अन्याय होत असल्याच्या भावना सोमवारी काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यातही काही बँका, पतसंस्थांच्या वेळेत तफावत दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे बँकांमध्ये कोरोना समूह संसर्गाची (कम्यूनिटी स्प्रेड) भीती व्यक्त होत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम लागू केला आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यातील बँकेचे व्यवहार सकाळी आठ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहेत. परंतू बुलडाणा जिल्ह्यामध्ये बँकेच्या वेळेमध्ये कुठलाच बदल करण्यात आला नाही. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असतानाही बँकामध्ये आवश्यक ते बदल झालेले दिसून येत नाहीत. बँकामध्ये येणाºया ग्राहकांचा लोंढा कायमच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पृष्टभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र बँकामधील गर्दी थांबण्याचे नाव घेत नाही.सर्वच कर्मचाºयांना रहावे लागते उपस्थित'करोना'च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी कार्यालयांतील कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर ठेवण्यात येत आहे. बहुतांश कार्यालयातील कर्मचाºयांसाठी रोटेशन पद्धत सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी कर्मचाºयांना आळीपाळीने कार्यालयात उपस्थित राहून कामकाज केले जाते; परंतू बँकेत अशा प्रकारचे धोरण अद्याप अवंलबण्यात आलेले नाही. बºयाच बँकामध्ये कर्मचाºयांचा अभाव असल्याने सर्वच कर्मचाºयांना कामावर हजर रहावे लागत आहे. दुपारनंतर बँकेत येणाºयांची गर्दी कमी होते. तरीसुद्धा कर्मचाºयांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत बँकेत रहावे लागते. दुपारनंतर शहरातील बरेच रस्ते बंद केले जात असल्याने या कर्मचाºयांना घरी जाण्यासही अडचणी येतात.
सध्या जिल्ह्यातील बँकाची वेळ ही जुनीच आहे. वेळेत नवीन बदल नाहीत. कर्मचारी उपस्थित राहण्याबाबतचे नियोजन हे प्रत्येक बँक आपल्या स्तरावर करू शकते.-विनोद मेहेरे, व्यवस्थापक, अग्रणी बँक़
कोरोनाच्या पृष्टभूमीवर बँकेची वेळ सकाळची झाल्यास सोईचे होईल. बँकेत येणाºया नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सांगण्यात येते. तरीसुद्धा काही लोक ऐकत नाहीत.
-चित्तरंजन राठी,कार्यकारी सदस्य, सेंट्रल बँक आॅफ इंडीया कर्मचारी संघटना.