बुलडाणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जिल्ह्यात वाढत असून गेल्या वर्षभरातील कोरोना बाधितांच्या संख्येचा उच्चांक २६ मार्च रोजी जिल्ह्यात गाठला गेला. तब्बल ९०३ जण चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे.परिणामस्वरुप जिल्ह्याचा सरासरी १४ टक्के असलेला पॉझिटिव्हीटी रेट आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुदैवाने जिल्ह्याचा मृत्यूदर ०.७४ टक्क्यांवर स्थिर आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर आहे.
दुसरीकडे एकट्या बुलडाणा तालुक्यात १४६, खामगाव तालुक्यात १५३, मेहकर तालुक्यात१०३, नांदुरा तालुक्यातल १०४, मलकापूर तालुक्यात ९३, शेगावमध्ये ६६, देऊळगाव राजातही ६६, चिखली ४४, लोणार ३२, मोताळा ३४, जळगाव जामोद ६, सिंदखेड राजा ५५, संग्रामपूर १ या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
यापूर्वीचा उच्चांक ८८५यापूर्वी १८ मार्च रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ८८५ जण कोरोना बाधीत निघाले होते तर याच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ मार्चला ८६१, २४ मार्चला ८५५, ६ मार्च रोजी ८३७, २२ मार्च रोजी ५०६ आणि २१ मार्च रोजी ८०२ जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे मार्च महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येने वारंवार उच्चांकी आकडा गाठला आहे. परिणामस्वुरूप कोरोनाची दुसरी लाट ही सध्या जिल्ह्यात महत्तम पातळीवर पोहोचली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.