बुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर पालिका प्रशासनाकडून शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. बुलडाणा नगर पालिकेकडून शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये २४ मार्च रोजी स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी नगर पालिकेचे १११ सफाई कर्मचारी व अग्नीशामक यंत्रणेच्या १२ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यासाठी वारंवार स्वच्छता राखण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, २४ मार्च रोजी जिल्ह्यातील बहुतांश नगर पालिकेकडून शहरी भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बुलडाणा पालिकेकडून जिल्हा मुख्यालय असलेल्याने विविध शासकीय कार्यालयात स्वच्छता करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातही विशेष काळजी घेण्यात येत आहेत. रुग्णालयासोबत परिसराचीही पालिकेकडून स्वच्छता करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी बसस्थानक धुऊन काढले होते. त्यामुळे नगर पालिकेकडून कित्येक वर्षानंतर बसस्थानकात स्वच्छता झाल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. मंगळवारी शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेसाठी नगर पालिकेच्या १११ सफाई कर्मचाºयांनी व अग्नीशमन यंत्रणेच्या १२ कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
CoronaVirus : बुलडाणा नगरपालिकेकडून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 2:24 PM