बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, आणखी एका महिलेचा काेराेनामुळे साेमवारी मृत्यू झाला, तसेच ५४ जणांचा काेराेना अवाहल पाॅझिटिव्ह आला आहे. ५३४ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, ४२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. पंचमुखी नगर, मलकापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णांचा उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५३४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५० व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ४ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १७, बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला ३ , चिखली शहरातील १२, चिखली तालुक्यातील शेलूद ३, दे. घुबे २, किन्होळवाडी १, धोडप १, नायगाव बु. १, मेरा बु. १, पळसखेड २, मेहकर तालुक्यातील लोणी गवळी १, सोनाटी १, वाडेगाव १ खामगाव शहरातील चार, नांदुरा शहरातील तीन, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील एकाचा समावेश आहे. तसेच ४२ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा शहरातील अपंग विद्यालयातील दाेन, खामगाव शहरातील सात, दे . राजा येथील १५ , सिं. राजा येथील ६, शेगाव येथील पाच मलकापूर येथील दाेन आणि चिखलीतील पाच रुग्णांचा समावेश आहे.
१४७ जणांचा मृत्यू जिल्ह्यात ८४० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार १९० कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी ११ हजार ६७९ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.