लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी जानेफळ येथील कोराना बाधीत ८५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान गुरूवारी तपासणीत ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या १,१८१ पैकी १,११९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या ६२ अहवालामध्ये दहिद एक, दिवठणा तीन, गोंधनापुर एक, चिखली चार, गोद्री एक, मोताळा एक, उबाळखेड एक, देऊळगाव राजाोक, पिंपळगाव एक, लोणार चार, भालेगाव एक, पळसखेड चक्का चार, पांगरखेड आठ, उमरद एक, महारखेड दोन, सावखेड एक, शिवणी टाका एक, साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा तीन, नांदुरा एक, शेगाव चार, माटरगाव एक, शिरसगाव निळे एक, जळगाव जामोद दोन, टाकळी एक आणि अमरावती येतील एक, अकोला जिल्ह /ातील पातरू येथील एक तर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात येत असलेल्या दासनूर येथील पाच जणांचा यात समावेश आहे. दुसरीकडे मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ८५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये संग्रामपूर दोन, मेहकर ११, मलकापूर एक, खामगाव ३०, चिखली सहा, देऊळगाव राजा तीन, बुलडाणा सात, शेगाव नऊ, नांदुरा चार, जळगाव जामोद एक आणि लोणार येथील तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक टक्कयांनी वाढले असून ९३ टक्क्यावरून ते ९४ टक्के झाले आहे. दुसरीकडे कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १.३२ टक्के आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १२९ झाली.
CoronaVirus : जानेफळमधील महिलेचा मृत्यू, ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 11:53 AM