- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘कोरोना’ व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चायनिज पदार्थांकडेही खव्वय्यांचा ओढा कमी झालेला आहे. ‘चायनिज’ पदार्थ खाणाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती असल्याने २० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या चिनी माल आणि चायनिज पदार्थ विक्रीवर होणाºया लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रत्येकजण चायनिज सेंटर गाठतो. चायजिन खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रत्येक शहरात चायनिज पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतू चायनिज पदार्थांच्या या विक्रीला ‘कोरोना’ विषाणूमुळे मोठा फटका बसला आहे. सतत गजबजणारी चौपाटी कोरोनाच्या भितीमुळे शांत झाली आहे.कोरोना व्हायरसची दहशत पसरल्यापासून चायनिज पदार्थ खाणाºया ग्राहकांची संख्या २० टक्क्याने कमी झाली आहे. चीनमध्ये तयार होणारी चिली बिन पेस्ट आणि तिथून येणारे काही मसाले तुम्ही चायनिजमध्ये वापरता का? असे अनेक प्रश्न ग्राहक चायनिज सेंटर चालकांना विचारत आहेत. चायनिज पदार्थ खाल्ल्याने त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होईल, या भितीने काही दिवस चायनिज न खाल्लेलेच बरे, अशी सावधगिरीची भूमिका ग्राहक आता बाळगत आहेत. हॉटेल्समध्येही चायनिज मागणाºयांची संख्या कमी झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.
चायनिज पदार्थांकडे पाहिले जाते संशयानेचायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. चायनिजच्या प्रत्येक पदार्थामध्ये सॉस असतो. नेमका हा सॉस चीनमधून येतो की इतर कोठून असा प्रश्न ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या भितीमुळे चायजिन पदार्थांकडे ग्राहक संशयाने बघत आहेत.बुलडाण्यात जळगाव खांदेशचा ‘सॉस’चायनिज सेंटरवर मिळणारे नुडल्स, वेगवेगळे राईस, सोया चिली, मन्चुरीयन, ड्रॅगन फुट्स अशा वेगवेगळ्या पदार्थामध्ये ‘सॉस’ हा महत्त्वाचा घटक असतो. परंतू बुलडाण्यामध्ये जळगाव खांदेशमधून सॉस आणला जात असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली.
चायनिज सेंटरवर तयार होणारे पदार्थ हे आपल्याच येथे तयार केले जातात, त्यामुळे त्याची भिती बाळगण्याचे काही कारण नाही. परंतू ‘हाफ फ्राय’ असलेले पदार्थ खाणे किंवा कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.- डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.