लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जगभर हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेत भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी पालिकेने एक आराखडा तयार केला. त्याद्वारे दररोज सकाळी नागरिकांची स्वयं आरोग्य तपासणी केली जात आहे.भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करणारी नांदुरा ही जिल्ह्यात पहिली नगर पालिका ठरतेय. नांदुरा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहरातील विविध वस्ती यापूर्वीच सील केल्या आहेत. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर आराखडा विकसीत करण्यात आला आहे. याद्वारे कोरोना संशयीत रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे.
गुगललिंक नागरिकांच्या व्हॉट्स अपवर !नांदुरा नगर पालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार एकलिंक नागरिकांच्या व्हॉट्स अॅपवर टाकण्यात येत आहे. ती लिंक लोक सेल्फ असेसमेंट करून दररोज आपला चांगला अथवा आजारी असल्याचा अहवाल सादर करणार आहेत. यासाठी घरावरील क्रमांक महत्वाचा घटक असून तो लिंकमध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे कोरोना संशयीत रूग्णांवर पालिका वॉच ठेवणार आहे.
काय आहे भिलवाडा पॅटर्न !राजस्थानमधील भिलवाडा येथे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची देशभरात चर्चा आहे. भिलवाडा येथे प्रशासनाने प्रत्येक घरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लोकांचं स्क्रिनिंग केलं. तसेच नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करीत, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवेश नाकारण्यात आला. संशयीतांवर कडक नजर ठेवण्यात आली. यासाठी अद्ययावत अॅप आणि गुगलचा आधार घेण्यात आला. त्यामुळे हा पॅटर्न अल्पावधीत लोकप्रिय ठरला.
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नगर पालिकेने एक कृती आराखडा तयार केला आहे. भिलवाडाच्या धर्तीवरच हा आराखडा विकसीत करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पालिकेला सहकार्य करावे.--नीरज नाफडे, आरोग्य तथा पाणी पुरवठा अभियंता नगर परिषद, नांदुरा.