लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/पिंपळगाव सराई: येथील सैलानी बाबांची दरवर्षी भरणारी यात्रा कोरोना प्रतिबंधात्मक बाब म्हणून प्रशासनाने रद्द केली; परंतू तरीसुद्धा अद्यापही आरोग्य विभागाची चमू सैलानी येथे तळ ठोकून आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथे रुग्णसेवा देत आहेत.सैलानी यात्रा परिसरात आरोग्य विभागाचा कॅम्प असून पायदळ आलेले किंवा राना वनातून लपून छपून वाट काढत यात्रेकरू येतात. तेव्हा त्यांची आस्थेने विचारपूस आणि कोरोना बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. कोणीही घाबरून न जाता संकटाचा सामना करताना अफवा पासून रहावे, काय प्रतिबंध करावा, हात धुणे, गर्दीत न राहणे, यासह सर्दी, ताप, खोकला व इतर आजार बाबत रुग्ण सेवा देण्याचे काम येथे सुरू आहे. यात्रा रद्द झाली असली तरीही आरोग्य विभागाने आपली जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे.मास्क, रुमाल बांधून न डगमगता दुरदूरून आलेल्या रुग्णांची विचारपूस केल्याने रुग्ण भयमुक्त होताना दिसतात.या यात्रेत जिल्हा भरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ड्यूट्या दिवस रात्र नेमून दिलेल्या आहेत. घाबरून न जाता काळजी घ्यावी - सांगळेराज्यातही ‘कोरोना’चे रुग्ण आढळून आले असल्याने बुलडाणा जिल्हा प्रशासनाकाडून याबाबत प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागासह इतर विभागाच्या समन्वयाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सैलानी येथे आरोग्य विभागाचे वतीने कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या आजाराला घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी केले आहे.
सर्व वैद्यकीय चमू ‘कोरोना’ बाबत जनजागृती करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सैलानी दिवस रात्र आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे.- डॉ. प्रवीण निकस, वैद्यकीय अधिकारी