लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १० मे पासून कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचा वेग वाढला असून गेल्या १६ दिवसात जिल्ह्यात २४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून या कालावधीत दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या ५९ दिवसामध्ये तीन कोरोना बाधीतांचा मृत्यू झालेला आहे.बुलडाणा जिल्ह्यात तिसऱ्या व चौथ्या लॉकडाउन दरम्यान मिळालेल्या शिथिलतेमुळे पश्चिम महाराष्ट्रासह, पुण्या, मुंबईतून एक लाखा पेक्षा अधिक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसह शहरी भागातील रुग्णालयांमध्ये सर्व्हेक्षण पथकांसह, आरोग्य विभागाच्या पथकांकडून या रुग्णांची नियमित पणे तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे संदिग्ध रुग्णाला तत्काळ शोधने आरोग्य यंत्रणेला शक्य होत आहे. मात्र अनेकदा प्रशासकीय यंत्रणेला बाहेर गावाहून जिल्ह्यात स्वगृही आलेल्या व्यक्तींकडून अचूक व खात्रीशीर माहिती दिल्या जात नसल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण होत आहे. जिल्ह्यात १० मे पासून कोरोना बाधीत रुग्ण सापडण्यास पुन्हा सुरूवात झाली होती. १० मे ते २६ मे या कालावधीत जिल्ह्यात २४ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाने शिरकाव केला असून जवळास सव्वा लाखांच्या आसपास लोकसंख्या ही जिल्हयातील प्रतिबंधीत क्षेत्रात आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याची भीती व्यक्त होत आहे.२८ एप्रिल नंतर जिल्ह्यात कारोना बाधीत रुग्ण जवळपास १३ दिवस सापडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल त्यावेळी ग्रीन झोनकडे सुरू झाली होती. मात्र दहा मे रोजी जिल्ह्यात रुग्ण सापडल्याने बुलडाणा जिल्हा हा आॅरेंज झोनमध्ये आला होता.
१३ दिवसानंतर सापडला होता नवीन रुग्णबुलडाणा जिल्ह्यात २७ एप्रिल नंतर एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. ही स्थिती जवळपास १३ दिवस कायम होती. मात्र जळगाव जामोद येथील एक व्यक्ती बºहाणपूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तेथील त्याचा एक नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या व्यक्तीनेही तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. तेव्हापासून आजपर्यंत जिल्ह्यात २४ रुग्ण सापडले.